राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे सकल हिंदु समाज यांच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे नवरात्रनिमित्ताने दररोज सकाळी ७ वाजता ९ दिवस दुर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथे सकल हिंदु समाज यांच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे नवरात्रनिमित्ताने दररोज सकाळी ७ वाजता ९ दिवस दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दुर्गामाता दौड तयार व्हावी, देव देश, धर्मासाठी प्रत्येकाचेत काही ना काही विविध भागांमधून योगदान असावे, याकरिता नऊ दिवस निघत असते, तसेच अनेक महिलांचा देखील यात समावेश असतो.
राहुरी फॅक्टरीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड संपन्न होत असून तरुण-तरुणी महिला अबाल वृद्ध या दौडमध्ये सहभागी होत आहे.
राहुल फॅक्टरी येथील प्रत्येक ठिकठिकाणी ही दौड निघत असून सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत या दौडचे आयोजन करण्यात येते.यावेळी प्रत्येक भागातून महिला दौडचे पूजन करून वंदन केले जाते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत