देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिकेचे बिगुल अद्याप वाजलेलेही नसतानाही राजकारण मात्र तापू लागले आहे.माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे बिगुल अद्याप वाजलेलेही नसतानाही राजकारण मात्र तापू लागले आहे.माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी आज नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनांत अधिकाऱ्यांची बैठक घेत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर व्हायरल करत नागरिकांनी दोनदा आमदारकी देऊनही खुर्चीचा मोह आवरेना अशी टीका केली आहे.
दरम्यान या व्हिडीओ नंतर कदम समर्थक कार्यकर्ते एकत्रित जमल्याचे पहावयास मिळाले त्यांनतर कदम समर्थकांनी सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल केला असून यात म्हटले आहे की,देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता समक्ष अधिकाऱ्यांसह राहुरी तालुक्याचे मा.आ. चंद्रशेखर कदम पा. हे उद्या दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी स. १०.०० वा. देवळाली प्रवरा नगरपरिषद येथील नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये उपस्थित राहणार आहेत.
एकंदरीतच माजी आ.कदम पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही उद्या शुक्रवारी पुन्हा याच ठिकाणी बैठक घेणार असल्याने नेमकी काय घडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत