राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांसाठी लाईन इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांसाठी लाईन इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शनिवार 21 ऑक्टोबर रोजी ठीक 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात डोळे तपासणी व नंबरचे चष्मे माफक दरात वाटले जातील.डोकेदुखी, ताप, सर्दी,खोकला,अंगदुखी,त्वचेचे विकार,पोटाचे विकार,मणक्याचे आजार अशा सर्व आजारावर मोफत औषध वाटप केले जाईल
त्याचबरोबर गुडघेदुखी, कम्बरदुखी,सांधेवात, मानदुखी,या सर्व आजारावर मोफत आयुर्वेदिक थेरपी केली जाईल मूळव्याध, हर्निया, फिशर यांची मोफत तपासणी केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत