राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- वंचित बहुजन आघाडीचे राहुरी शहराध्यक्ष विजय उर्फ पिंटूनाना साळवे यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लाथाने मारून खाली ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
वंचित बहुजन आघाडीचे राहुरी शहराध्यक्ष विजय उर्फ पिंटूनाना साळवे यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लाथाने मारून खाली पाडल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३०.च्या दरम्यान विजय उर्फ पिंटू नाना साळवे जेवण करून परत येत असताना राहुरी कॉलेज रोडला पल्सर वर तोंड बांधून आलेल्या दोन जणांनी पिंटू नाना साळवे यांना गाडी अडवून " नाना गलांडे"च्या विरोधात जाऊन आंदोलन करतोस काय? तुला बघतो..फक्त त्यांचा जामीन होऊ दे..असे म्हणून गाडीला लाथ मारली व निघून गेले..त्या अज्ञात व्यक्तिविरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
या सगळ्या घटने मागचा मास्टर माईंड नाना गलांडे याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष महेश साळवे यांनी केली आहे
या घटनेचा निषेध म्हणून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत