आंबी(वेबटीम) केंद्रशासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे केसापूर (ता. ...
आंबी(वेबटीम)
केंद्रशासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे केसापूर (ता. राहुरी) येथे सरपंच सुशीलाताई दादासाहेब मेहेत्रे व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी रथयात्रेद्वारे प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण अजीविका मिशन, पीएम किसान, फसल बीमा योजना, पोषण अभियान, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, जन औषधी योजना, पीएम गरीब कल्याण अन्न योजना आणि विश्वकर्मा योजना आदी योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली. परिसरातील ज्यांना या योजनेद्वारे लाभ मिळाला आहे त्यांनी संबंधित योजनांची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी भाऊसाहेब मेहेत्रे यांच्या शेतात ड्रोनचे प्रत्याक्षित करण्यात आले.
सरपंच सुशीलाताई दादासाहेब मेहेत्रे यांनी केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना तसेच ग्रामपंचायतला मिळालेल्या विविध लाभांची उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सरपंच सुशीलाताई दादासाहेब मेहेत्रे, सोसायटीचे चेअरमन ललित टाकसाळ, माजी चेअरमन राजेंद्र खैरे, गोकुळ टाकसाळ, माजी सरपंच गुलाबराव डोखे, माजी उपसरपंच दादासाहेब मेहेत्रे, प्रसाद पवार, रामभाऊ देवकर, विलास रणदिवे, बाळकृष्ण मेहेत्रे, भाऊसाहेब डोखे, ग्रामपंचायत सदस्य कांचन रणदिवे, संभाजी शेलार, ग्रामसेविका वैशाली देवकर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यांसह परिसरातील विविध विभागातील शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत