देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीय आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीय आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव अंतर्गत आज मंगळवार दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तर उद्या बुधवार १० जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
आज मंगळवारी सायंकाळी ४ वाजता साई ग्रंथ मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत माता-भगिनी, अबाल वृद्ध, टाकळरी वारकरी सहभागी होणार आहे.५ वाजता साई मंदिरात साई बाबा मूर्तीला सिहांसन अर्पण उद्धव महाराज मंडलीक यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न होऊन करण्यात येणार आहे.
तद्नंतर साई चरित्र पारायण व कीर्तन महोत्सव धर्म मंडपात देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होणार आहे.
सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महंत उद्धव महाराज मंडलीक यांचे कीर्तन व महाप्रसाद तर उद्या बुधवार सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प पांडुरंग महाराज वावीकर यांचे काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसाद पंगतींनी सोहळ्याची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत