राहुरी(प्रतिनिधी) आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने दिल्याच्या निषेधार्थ श नगर मनमाड ...
राहुरी(प्रतिनिधी)
आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने दिल्याच्या निषेधार्थ श नगर मनमाड राज्य मार्गांवर पाण्याचे टाकी चौकात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यानंतर राहुरीत शिवसेनेच्यावतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे तालुका प्रमुख सचिन म्हसे व शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे श्रीरामपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश निमसे विधानसभा मतदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड रस्त्यावर येत राहुल नार्वेकर यांच्या पुतळ्याचे दहन करून पुतळ्यास जोडे मारत दहन केले.उपजिल्हा प्रमुख भागवत मुंगसे ,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिन म्हसे, शहराध्यक्ष संजय म्हसे ,विजय शिरसाठ,कैलास कोहकडे, सचिन लाटे,ईश्वर कुसमुडे,राहुल चोथे,हमीद पटेल,सचिन करपे,रोहन भुजाडी,कैलास शेळके,पोपट शिरसाठ राष्ट्रवादीचे श्रीरामपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश निमसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव,नवाज देशमुख यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तर शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी एकत्रित येत फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आमदार पात्र ठरल्याबद्दल आनंद उत्सव साजरा केला.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणाले कि, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून निकाल देत धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह देखील दिलेले आहे.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणूनएकनाथजी शिंदे साहेब यांना न्याय मिळाला आहे.वारस हक्काने कुटुंबाची संपत्ती मिळू शकते,राजकीय पक्ष नाही,हे आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे.लागलेल्या निकालामुळे सर्व सामान्य शिवसैनिक शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात आणखी जोमाने सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी काम करणार आहेत. प्रसंगी राहुरी तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे,ता.कार्याध्यक्ष रोहित नालकर,ता.संघटक महेंद्र उगले,शिवदूत महेंद्र शेळके,दादा पटारे,सागर थोरवे,ता.प्रसिद्धी प्रमुख बाप्पुसाहेब काळे,शुभम भोंगळ,विजय पटारे,संकेत शेलार,दत्तात्रय काळे,अविनाश क्षिरसागर आदी शिवसैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत