राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध मेळावा उत्साहात पार पडला. सन १९९...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध मेळावा उत्साहात पार पडला. सन १९९३ या वर्षी इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेले माजी विद्यार्थी या स्नेहबंधात सहभागी झाले होते.
१ ली पासुन बरोबर असणारे विद्यार्थी मित्र सहभागी झाले होते या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, ठाणे, बारामती, नाशिक, औरंगाबाद, जालना, नगर व संगमनेर येथून सकाळी वर्गमित्र व मैत्रिणी होते.
जुन्या आठवणी ताज्या करत आनंदून गेले वर्ग पाहून बेंचवर बसून सर्व भारावून गेले होते. त्याचबरोबर जुने खेळ खेळण्यासाठी आयोजक मित्रांनी विट्टीदांडू,टिपऱ्या उपलब्ध करून दिल्या. अनेक विद्यार्थी मित्रांनी गाणी गायली पुढील आयुष्यात एकमेकांना सहकार्य करू असे मित्र परिवार एकमेकांना सांगत होते. अशा वेळी आजचा दिवस संपुच नये असे वाटत असतानाच आपण पुन्हा एकदा स्नेहबंधात भेटू या आशेने निरोप घेतला यावेळी आयोजक मित्र परीवारांनी नाष्टा, जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत