कोपरगाव(वेबटीम) नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही कोपरगाव शहरातील जुनी कचेरी, गोसावी मठ परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकान...
कोपरगाव(वेबटीम)
नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही कोपरगाव शहरातील जुनी कचेरी, गोसावी मठ परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर शहर पोलिसांनी छापा टाकून नायलॉन मांजा जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जुनी कचेरी, गोसावी मठ परिसरात अबुजर हाजीहबीब मिनियार हा नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गुप्त बातमी दाराच्या माध्यमातून समजले असता त्या ठिकाणी छापा टाकून १५०० रुपये किंमतीचे दोन नायलॉन मांजा रीळ जप्त केले आहे.
याबाबत शहर पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे यांच्या फिर्यादीवरून अबुजर हाजीहबीब मिनियार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जे.पी. तमनर करीत आहेत.
सध्या संक्रात सणाच्यानिमित्ताने पतंगबाजीची लगबग असते कोपरगावात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी नायलॉन मांजा विक्री करण्यांवर कारवाई सुरू केल्याने सामान्य नागरिकांतून या कारवाईचे स्वागत होत आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत