राहुरी(वेबटीम) राहुरीतील विकास कामांवरून विखे-कर्डिले विरूद्ध तनपुरे असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सूरू असून गणेगाव येथील रस्त्याच्या...
राहुरी(वेबटीम)
राहुरीतील विकास कामांवरून विखे-कर्डिले विरूद्ध तनपुरे असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सूरू असून गणेगाव येथील रस्त्याच्या कामावरून हा श्रेयवाद चांगलाच असता.आ.तनपुरे यांनी या रस्त्याचे काम माझ्या पाठपुरावातून मंजूर झाल्याचे सांगून रस्त्याचे भूमिपूजन केले. तर दुसरीकडे कर्डिले समर्थकांनी हा रस्ता माजीमंत्री कर्डिले यांचयमुळेच मंजूर केल्याचा दावा केला. यावरून सोशल वार ही रंगला होता. दरम्यान खा.सुजय विखे व माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनीही गणेगाव रस्त्याचे भूमिपूजन केले होते. मुळा डॅम फाटा ते मुळा धरणाच्या रस्त्याचे कामासाठी दोन दिवसांपूर्वी रस्ता रोको केला होता. याच रस्त्याच्या कामाबाबत विखे - कर्डिले यांनी भूमिपूजन केल्यानंतर काही वेळातच आ.प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आ.कर्डिले यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.
या पोस्टमध्ये आ.तनपुरे यांनी म्हंटले की,याला म्हणतात आयत्या पीठावर रेघा ओढणे !!!
ज्या रस्त्याची प्र. मा. आमच्या सरकारच्या काळात झाली (1 एप्रील 2022), तुमच्या सरकारने टेंडर काढायला वर्ष लावलं, विधानसभेत मी लक्षवेधी लावल्यावर तुम्ही टेंडर उघडलत, तुमच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळालं नाही म्हणून तुम्ही ठेकेदारावर दबाव आणून त्याला काम चालू करू देत नाही, मला नगर मनमाड हायवेवर रास्तारोको करावा लागला आणि वर टोपी करत तुम्ही उद्घाटन करताय!
ज्यांच्यामुळे काम सुरू व्हायला तब्बल दीड वर्ष उशीर लागला, असे उद्घाटनवीर फोटोत दिसताहेत. काहींना माजी झाले तरी फुकट नारळ फोडण्याची हौस जात नाही.
एकंदरीत राहुरीत श्रेय वादावरून विखे-कर्डिले विरुद्ध तनपुरे असा संघर्ष आगामी काळात सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत