राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील एका शाळेतील शैक्षणिक सहल रद्द बाबतच्या प्रकरणाची चर्चा थांबत नाही तोच याच शाळेतील एका प्रकरणाव...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील एका शाळेतील शैक्षणिक सहल रद्द बाबतच्या प्रकरणाची चर्चा थांबत नाही तोच याच शाळेतील एका प्रकरणावरून भर रस्त्यात चोप दिल्याची घटना शनिवारी घडली असल्याचे चर्चेतून समजते. या शिक्षकाचे याआधीचे नाजूक प्रकरणातून काही किस्से उजेडात आले असून शनिवारचा प्रकार नेहमी कशातून घटना याबाबत राहुरी फॅक्टरीत जोरदार चर्चा सुरू होती.
राहुरी फॅक्टरी येथील एका शिक्षकाला भर रस्त्यात गाठून भर रस्त्यावर काहींनी चोप दिल्याची घटना शनिवारी घडल्यानंतर त्याबाबत शाळेतील शिक्षक व स्थानिक बघ्यांत खमंग चर्चा सुरू होती.
नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेल्या सदर शिक्षकाकडून पूर्वी काम करत असलेल्या शाळेत व अन्य ठिकाणी विद्यार्थीनी बाबत चुकीच वागण्याच्या घटना ऐकिवात आहे.
एका विशिष्ट उपक्रम संदर्भातची जबाबदारी सदर शिक्षकाकडे असल्याने माझे कोणी काही करू शकत नाही. सदर उपक्रमाच कवच घेऊन हा शिक्षक मुक्तपणे फिरत असतो.
राहुरी फॅक्टरी येथील सदर शाळेची पटसंख्या कमी होत असताना ती वाढविण्यासाठी कोणीही धजत नसून सध्या वेगवेगळ्या कारणाने ही शाळा नेहमी चर्चेत येत आहे. प्राचार्य यांचा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याने शाळेबद्दल अनेक तक्रारी पुढे येत आहेत.
त्यातच शिक्षकाकडून असे चुकीचे प्रकार घडत असेल तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा असा सवाल पालक वर्गातून उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत