श्रीरामपूर(वेबटीम) अल्पावधीतच गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या श्रीरामपूर शहरातील गायिका वैदेही श्रीपाद मेंगदे यांना अहमदनगर येथील स्व....
श्रीरामपूर(वेबटीम)
अल्पावधीतच गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या श्रीरामपूर शहरातील गायिका वैदेही श्रीपाद मेंगदे यांना अहमदनगर येथील स्व. पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
श्रीरामपूर येथील गायिका वैदेही मेंगदे यांनी उत्तर नगर जिल्ह्यात सांस्कृतिक व इतर कार्यक्रमात आपल्या गायन कलेने रसिकांची वाहवा मिळवली आहे. मराठी, हिंदी चित्रपट गीते , भावगीते, भक्तिगीतांचा कार्यक्रम सादरीकरण त्यांच्या माध्यमातून सुरू असतो.
त्यांच्या गायन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्ताने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील स्व. पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी राजेंद्र देसाई कवी आनंद साळवे, शेख सर, श्री.खैरनार दादादा, श्रीपाद मेंगदे आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत