राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे म्हणताय.. कोणीही अफवा... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरे म्हणताय.. कोणीही अफवा...

  राहुरी(वेबटीम) आपण सर्वानी मला राजकीय जीवनात खुप साथ दिली, धन्यवाद ...माफी असावी…थांबतो आता ! अशा आशयाची राहुरीचे आमदार माजी मंत्री प्राजक...

 राहुरी(वेबटीम)



आपण सर्वानी मला राजकीय जीवनात खुप साथ दिली, धन्यवाद ...माफी असावी…थांबतो आता ! अशा आशयाची राहुरीचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने असलेल्या फेसबुकवर अकाऊंटवर टाकल्याने राहरीच्या राजकारणात खळबळ उड़ाली असता रात्री १० वाजता आ.प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या अधिकृत पेजवर खुलासा करणारी पोस्ट टाकल्याने राजकिय वर्तुळात होणाऱ्या वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


               आज शुक्रवारी सकाळी ९ वाजता आ. प्राजक्त तनपुरे यांनी नावाने असलेल्या एका फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्ट मध्ये म्हंटले होते की, 


आपण सर्वनी मला राजकीय जीवनात खुप साथ दिली, धन्यवाद! मी माझ्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही,काही चुकलं असेल तर माफ करा. उद्या ईडीची तारीख आहे. त्याबाबतीत मी मोडेल पण वाकणार नाही. पण इतर काही वैयक्तिक बाबी आहेत ज्यामुळे मी पदाला न्याय देवू शकत नाही. माफी असावी, थांबतो आहे’, असे म्हणत आ.प्राजक्त तनपुरे यांनी या पोस्टमध्ये सर्वांना हात जोडले आहे. काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र अनेकांनी त्या पोस्टचे स्क्रीन शॉट घेत समाज माध्यमांवर व्हायरल केले. प्रसारमाध्यमांत सदर वृत्त प्रसारित होताच एकच खळबळ उडाली. तनपुरे समर्थक कार्यकर्ते याबाबत एकमेकांना विचारणा करू लागले. अनेकांनी आ.तनपुरे यांना संपर्क केलं मात्र ते ईडी चौकशीत असल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 दरम्यान आज रात्रीच १० वाजता आ.तनपुरे यांच्या अधिकृत पेजवरून खुलासा करणारी पोस्ट तनपुरे यांनी टाकली असून यात म्हंटले की, हे माझे अधिकृत फेसबुक पेज आहे (Bluetick Page). माझ्या नावाच्या इतर कोणत्याही पेज अथवा फेसबुक अकाऊंट वरून पसरवलेली माहिती ही माझी अधिकृत भुमिका नाही. कृपया कोणी अफवा पसरवू नये. अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये.


 आ.तनपुरेंनी खुलासा करणारी पोस्ट टाकल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत