राहुरी(वेबटीम) प्रबोधन एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन संचलित मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आग्रेवाडी म्हैसगाव या स्कूल मधील विद्यार्थांचे वार्षिक ...
राहुरी(वेबटीम)
प्रबोधन एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन संचलित मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आग्रेवाडी म्हैसगाव या स्कूल मधील विद्यार्थांचे वार्षिक हिवाळी शिबिर नुकतेच पार पडले. शाळेपासून 20 कि मी दूर असलेल्या पळशी ता.पारनेर या गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात दि 30 डिसेंबर व 31 डिसेंबर या दरम्यान शालेय वार्षिक हिवाळी शिबिर मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. या दोन दिवसीय शालेय वार्षिक हिवाळी शिबिरात शाळेचे 5वी ते 10 मधील 120 विद्यार्थी व 10 शिक्षक - शिक्षिका यांनी उत्सुर्त सहभाग घेतला.
प्रति पंढरपूर या नावाने परिचित असलेल्या पळशी या गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात कडाक्याच्या थंडीत 2 दिवस वास्तव करून निसर्ग सनिध्याचा अनुभव घेतला. शिबिराच्या सुरुवातीला मंदिर स्वच्छ्ता करण्यात आली, या नंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये फेरी काढली यामध्ये स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिक मुक्त भारत, स्वदेशीचा वापर,मतदान जनजागृती,साक्षरता काळाची गरज, सकाळी व्यायाम आणि योगासने सराव, स्व:संरक्षण आदींचा अंतर्भाव होता. हवा, जमीन, पाणी आणि ध्वनिप्रदूषण यांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय मार्गदर्शन, पर्यावरण आणि मी याविषयी चर्चा आणि उपक्रम, भारतीय वंशाच्या झाडांविषयी माहिती, साहसी खेळ आदी घेण्यात आले. दोन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिर पर्यावरण संवर्धन जनजागृती उपक्रम या दरम्यान केले व त्या गावात असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूबद्दल माहिती मिळविली. सायंकाळी विद्यार्थ्यांनी काही मनोरंजनात्मक खेळ, शेलापागोटे, गाणी म्हणणे व शेकोटीचा आनंदही घेतला. अश्या अनोख्या वातावरणात राहण्याचा अनुभव घेताना विद्यार्थांचा आनंद व उत्साह गगनात मावेनासा झाला होता. शिबिराच्या समारोप कार्यक्रमामध्ये पळशी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री मिठूशेट जाधव उपाध्यक्ष श्री बन्सीभाऊ गागरे, राजेंद्र गागरे, गणेश गागरे, पोपट सुडके, संतोष वाळूंज, अजित मोढवे तसेच सर्व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले व हे ठिकाण शिबिरासाठी निवडले म्हणून शाळेचे आभार मानले. शिबिरासाठी विशेष सहकार्य देवस्थान ट्रस्ट,पळशी ग्रामस्थ,पालकवर्ग यांचे लाभले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष माने सर, माने मॅडम यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली आयोजित या शालेय वार्षिक हिवाळी शिबिरासाठी सर्व शिक्षकवृंद यांनी उत्तम नियोजन केले होते.
सदर वार्षिक हिवाळी शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री विनोद म्हसे जेष्ठ शिक्षक श्री रवींद्र दातीर , क्रीडा विभागाचे सुशांत आरंगळे सर व सर्व शिक्षकवृंद - शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत