देवळाली प्रवरा(वेबटीम) अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देवळाली प्रवरा शहरात विवि...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देवळाली प्रवरा शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
२२ जानेवारी रोजी सकाळी देवळाली प्रवरा शहरातील श्रीराम मंदिरात कार सेवकांच्यावतीने महाअभिषेक करण्यात येणार असून सकाळी ११ ते २ या वेळेत शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे मोठ्या पडद्यावर अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिर येथून श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार असून सर्व धर्मीय नागरिक यात सहभागी होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिरात भव्य दीपोत्सव कार्यक्रम व सायंकाळी ७ वाजता श्री साई मंदिरात श्री.साई प्रतिष्ठानच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान शोभा यात्रेसाठी सर्व माता भगिनींनी लाल साडी, चंद्रकोर टिकली व नथ अशी वेशभूषा परिधान करून यावे, सर्व पुरुष मंडळींनी पारंपारीक वेशभूषा करून यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत