सोनगाव/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शाहूनगर येथील झोपडपट्टी मधील रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व त्या वसाहतीस स्व. बाळासाह...
सोनगाव/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शाहूनगर येथील झोपडपट्टी मधील रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व त्या वसाहतीस स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी सोनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य राजन ब्राह्मणे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सोनगाव येथील शाहूनगर येथील वसाहत ही कारखान्याच्या मदतीने बांधण्यात आली होती तर त्यास 35 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या ठिकाणी 40 कुटुंब वास्तव्य करत आहेत. त्या वसाहतचे वीट, माती व सिमेंट पत्रा यात बांधण्यात आली होती. ती आज रोजी जुनी होऊन पडझड झालीआहे.
त्यामध्ये नागरिकांना राहण्यास कठीण झाले आहे. व त्या लोकांची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याकारणाने त्या घरांची दुरुस्ती करू शकत नाहीत. तरी आपण त्यांचा विचार करून त्यांना नवीन घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व घरे बांधून द्यावी अशा आशयाचे निवेदन राजन ब्राह्मणे यांनी नामदार विखे यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत