राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकायचे असल्यास केवळ पुस्तकी ज्ञानावर लक्ष न देता कौशल्य विकासाबरोबर माहिती...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकायचे असल्यास केवळ पुस्तकी ज्ञानावर लक्ष न देता कौशल्य विकासाबरोबर माहिती आणि तत्रंज्ञानाचे ज्ञान असणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्था(सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे यांच्या विद्यमाने राहुरी फॅक्टरी श्री स्वामी समर्थ एरा कॉम्प्युटर व टायपिंग एज्युकेशन या संस्थेत सुरू असलेल्या सारथी प्रोजेक्टच्या निमित्ताने सारथी विभागाचे अशोक काकडे, सारथी विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रीकांत देशमुख यांनी आपल्या संस्थेस भेट दिली प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत योगेश आंबेडकर व कांचन आंबेडकर यांनी केले.
यावेळी अहमदनगरचे गणेश आठरे यांच्या मार्गदर्शनानुसार असिस्टंट कॉर्डिनेटर भाऊसाहेब आठरे, एसबीयु व सारथी प्रोजेक्ट इन्चार्ज संगीत थोरात , वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज उपस्थित होते. यावेळी ओंकार गिते, प्राजक्ता गडाख, राहुल शेटे, श्रीकांत चव्हाण, सोमनाथ साठे,विकास झांबरे, स्मिता गाढे,संचेती गिते, प्रदिप गाढे, अनुराधा नेहे,पल्लवी खर्डे उपस्थित होते. वैष्णवी डौले हिने आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत