राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टरचा बेलापूर येथे आढळला मृतदेह - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टरचा बेलापूर येथे आढळला मृतदेह

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.भागवत आनंदा लहारे यांचा बेलापूर येथे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून डॉ.लहारे यांनी व...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील डॉ.भागवत आनंदा लहारे यांचा बेलापूर येथे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून डॉ.लहारे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे.

डॉ.भागवत लहारे हे शनिवारपासून बेपत्ता असल्याची चर्चा होती. आज सोमवारी दुपारच्या वेळी बेलापूर येथील नवले वस्ती परिसरात पाण्याची टाकी रोडला एका ओढ्याजवळ डॉ.लहारे यांचा मृतदेह आढळून आला असून त्याठिकाणी विषारी औषधाची बाटली मिळून आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

डॉ.लहारे अत्यंत मितभाषी होते त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.या घटनेने राहुरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत डॉ.लहारे यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत