राहुरी(प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी वांबोरीचे प्रदीप मकासरे यांची निवड करण्यात आली आहे. रिपब...
राहुरी(प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी वांबोरीचे प्रदीप मकासरे यांची निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सुनिताताई चव्हाण तसेच महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमित वर्मा आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती प्रदीप मकासरे यांची निवड करण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांच्या सहिने हे पत्र देण्यात आले आहे.
प्रदीप मकासरे यांनी आरपीआय तालुकाध्यक्ष पदावर काम केले असल्याने त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन जिल्ह्यात युवकांचे संघटन वाढवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल सामाजिक नेते तान्हाजी मिसळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब ओहळ, महाराष्ट्र सचिव अशोक ससाणे, महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत