राहुरी फॅक्टरीतील दोघांना अटक शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींना त्रास देणारे व जवळ घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील दोघांना अटक शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींना त्रास देणारे व जवळ घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- शाळा व महाविद्यालय परिसरात  असभ्य वर्तन करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील दोघांना राहुरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

शाळा व महाविद्यालय परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील दोघांना राहुरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन घातक शस्त्र जप्त केली आहे.

राहुरी पोलीस स्टेशननचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की, राहुरी येथे शाळा कॉलेज परिसरामध्ये काही तरुण युवक हे शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींना त्रास व्हावा या उद्देशाने असभ्य वर्तन करत आहे.यासाठी पथक नेमले असता सदर पथकाने सहा असभ्यवर्तन करणाऱ्या युवकांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई केली असता पैकी दोन युवकांनी दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे हत्यारे बनवलेली असल्याचे समजले.


 त्यानुसार राहुरी डीबी पथकास आरोपी अजित संभाजी शिंदे (वय - 19 वर्ष रा. समर्थ नगर, राहुरी फॅक्टरी ता. राहुरी जिल्हा अहमदनगर),  विठ्ठल माणिक गरजे (वय - 22 वर्ष रा. कामगार कॉलनी. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी जिल्हा अहमदनगर) यांना पकडले.

त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे बनवलेले हत्यार त्यांचे राहते घरातून काढून दिले. त्यामुळे दोघांवर अधिनियम कलम 4 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गुन्ह्याचा तपास  राहुरी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार तुळशीराम गीते करत आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, विभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ , साहेब फौजदार तुळशीराम गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल ,पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे , पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोवर्धन कदम यांच्या पथकाने केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत