देवळाली प्रवराचे रीलस्टार वैभव ढुस यांचा मुंबईत शरद पवारांच्या हस्ते ' आवाज महाराष्ट्र' पुरस्काराने गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराचे रीलस्टार वैभव ढुस यांचा मुंबईत शरद पवारांच्या हस्ते ' आवाज महाराष्ट्र' पुरस्काराने गौरव

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुप्रसिद्ध रील स्टार वैभव आप्पासाहेब ढूस यांना आधार सावली फाउंडेशनच्या वती...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुप्रसिद्ध रील स्टार वैभव आप्पासाहेब ढूस यांना आधार सावली फाउंडेशनच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते आवाज महाराष्ट्राचा हा मुंबई येथे पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.


प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आधार सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना घाणेकर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.


त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून वैभव यांचे अभिनंदन होत आहे. 

  दरम्यान यावेळी बोलताना वैभव ढुस यांचे वडील आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, 

       दि राहुरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा वैभव चे आजोबा व आमचें वडील कै. भिमराज रामजी ढूस यांचा घरामध्ये असलेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांचे सोबतचा फोटो पाहून माझाही राज्याच्या मुख्यंत्र्यांसोबत फोटो असावा असे मलाही खूप वाटायचे.. 

        आणि, कर्म धर्म संयोगाने सर्वांच्या सहकार्याने माझे हातून आंतरराष्ट्रीय स्तरावर साहसी क्रीडा प्रकारात घडलेल्या  कामगिरीमुळे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री अशोकराव  तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अशा सर्व तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना वारंवार भेटण्याची व त्यांचेसोबत फोटो काढण्याची संधी मला मिळाली. आणि आपोआप बालपणीची ती सुप्त इच्छा पुर्ण झाली. तदनंतर आमचे चिरंजीव वैभव आप्पासाहेब ढूस याने स्वतःच्या आवाजाच्या जादूने समस्त मराठी मनांना भुरळ घातली आहेव एक सुप्रसिद्ध रिल स्टार म्हणून राज्यात स्वतःचे नाव कमविले आहे. त्यामुळे कीत्येक वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविलेले तसेच माजी केंद्रीय मंत्री  पद्मविभूषण शरद पवार साहेब यांचे हस्ते नुकताच वैभवला आवाज महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

      आमचे वडील कै. भिमराज रामजी ढूस यांचे नंतर मुख्यमंत्री पदासारख्या राज्यातील सर्वोच्च राजकीय पदावरील व्यक्तीला भेटण्याची किंवा त्यांचेकडून सन्मानित होण्याची सलग तिसऱ्या पिढीमध्ये परंपरा वैभवने कायम राखली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत