राहुरी(प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाची राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उत्तर नगर युवक जिल्हाध्यपदी श...
राहुरी(प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाची राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून उत्तर नगर युवक जिल्हाध्यपदी श्रीरामपूरचे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे निवड करण्यात आली आहे. आरपीआय आंबेडकर पक्ष राहुरी तालुका अध्यक्षपदी श्याम जाधव यांची तर तालुका उपाध्यक्ष पदी सनी बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील, महिला आघाडीचे अध्यक्ष सुनिता चव्हाण व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून त्यानुसार नवीन पदाधिकारी निवडी केल्या जात आहे. श्रीरामपूचे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांना युवक उत्तर नगर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राहुरी तालुकाध्यक्षपदी शाम जाधव, उपाध्यक्षपदी सनी बनसोडे तर कोल्हार शाखाध्यक्षपदी सनी काळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, युवा नेते पप्पू गोडगे, युवा तालुकाध्यक्ष प्रतिक खरात, ज्येष्ठ नेते नाना वाघमारे, तालुका उपाध्यक्ष रमेश पडघमल आदिंसह भीमसैनिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत