नगर (विशेष प्रतिनिधी) नेवासा स्थित ईम्रान दारूवाला याच्यावर पोलीस ठाणे येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास उपविभागीय दंडाधिकारी नगर य...
नगर (विशेष प्रतिनिधी)
नेवासा स्थित ईम्रान दारूवाला याच्यावर पोलीस ठाणे येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास उपविभागीय दंडाधिकारी नगर यांनी एक वर्षाकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
आगामी लोकसभा निवडणूक विचारत घेता रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना हद्दपार करण्याबाबत पोलीस ठाणे नेवासाकडून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी ईम्रान दारूवाला यास अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आली आहे.
हद्दपरीचा आदेश झाल्यानंतर इम्रान दारूवाला यास अहमदनगर जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस पथकाच्या मार्फत तातडीने दाखल करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे नेवासा हद्दीत शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे हद्दपारचे देखील प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत व भविष्यात पाठवण्यात येणार आहेत. शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही असा इशारा पो.नि. धनंजय जाधव यांनी दिला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शेवगांव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. धनंजय जाधव, पो. उपनिरीक्षक जरे, पोलीस ठाणे नेवासा यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत