राहुरी फॅक्टरी येथील एक व्यावसायिक कुटुंबासह बेपत्ता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील एक व्यावसायिक कुटुंबासह बेपत्ता

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी असलेला व राहुरी फॅक्टरी व्यावसायिक आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाल्याने ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-



राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी असलेला व राहुरी फॅक्टरी व्यावसायिक आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाल्याने राहुरी फॅक्टरी व चिंचविहिरे परिसरात खळबळ उडाली. तब्बल १५ दिवस उलटले तरी या कुटुंबाचा शोध लागला नसल्याने नातेवाईक चिंचेत सापडले आहे. याबाबत जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात मिसींग बाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

             *बेपत्ता कुटुंब*

याबाबत अशोक माधवराव जोशी( रा. चिंचविहिरे ता.राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या मिसींग तक्रारीत म्हंटले माझा भाचा संतोष विनायक भोसले हा त्याच्या कुटुंबासह गावातच राहवयास आहे. २ फेब्रुवारी रोजी संतोष हा घरी आला व मला आईला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी द्या अस म्हणाला. त्यावेळी  जोशी यांनी त्याची एम एच. १५-एटी- ५३६७ ही  इंडिका व्हीस्टा  कार दिली. 



रात्री अशोक जोशी यांनी संतोष भोसले याच्या मोबाईलवर फोन केला असता फोन लागला. त्यावेळी जोशी यांनी घरी येऊन बघितले तर घराला कुलूप दिसले. आजूबाजूला व नातेवाईकांना चौकशी केली मात्र काहीच माहिती भेटली नाही.

      *बाईट- अशोक जोशी*

 दरम्यान संतोष विनायक भोसले(वय-३१) त्याची पत्नी भारती संतोष भोसले(वय-२५), त्याची लहान मुलगी ओवी संतोष भोसले(वय-२ वर्ष) व आई शकुंतला विनायक भोसले(वय-७३) हे संपूर्ण कुटुंब राहत्या घरातून बेपत्ता झाले असल्याने त्यांचे नातेवाईक अशोक जोशी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात मिसींग बाबत तक्रार दिली असून याबाबत तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहे. सदर कुटुंब कोठे दिसून आल्यास राहुरी पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे .


दरम्यान आर्थिक अडचणीत आल्यामुळे संतोष भोसले हा कुटुंबासह गायब झाल्याची चर्चा घडत असून पोलीस या कुटुंबाचा तपास करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत