राहुरी(वेबटीम) सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे य...
राहुरी(वेबटीम)
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नावाने असेच बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या नावाने बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट उघडल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर होता.
राहुरीचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला ठेंगे यांनी तात्काळ आपल्या मूळ फेसबुक अकाऊंट व व्हाट्स ऍप स्टेट्स वरून आपल्या एफबी मित्रांना माहिती देत सावध केले.
सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एखाद्या प्रसिद्ध व नामवंत व्यक्तीच्या नावे बनावट सोशल अकाऊंट तयार करून त्याद्वारे पैसे लुबाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. नगरच्या सायबर क्राईम ब्रँचकडे अशा अनेक तक्रारी येत आहेत.
आॅनलाइन व्यवहारातून फसवणूक, अल्प दरात कर्ज, वेगवेगळ्या ॲपद्वारे फसवणूक, तसेच आॅनलाइन व्हिडिओद्वारे अश्लिल फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत