जागृती फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जागृती फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

  श्रीरामपूर(वेबटीम) नाशिक येथील जागृती फाऊंडेशनच्या अहमदनगर शाखेच्यावतीने महिलांसाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे  होम मिनिस्टर स्पर...

 श्रीरामपूर(वेबटीम)



नाशिक येथील जागृती फाऊंडेशनच्या अहमदनगर शाखेच्यावतीने महिलांसाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे  होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



   सदर कार्यक्रमाचे आयोजन जागृती फाऊंडेशनचे संस्थापक् प्रशांत शेळके व संस्थपिका सौ ललिता नवघिरे यांनी अगदी नियोजपुर्वक केलेलं असताना त्यांना शाखा अध्यक्ष -सौ ज्योती जगताप व शाखा उपाध्यक्ष - सौ दिपाली पुराणिक यांचे सहकार्य मिळाले


सदर कार्यक्रमास अध्यक्ष स्थान अभिनेत्री हर्षाली भोसले(नाशिक) व उपाध्यक्ष स्थान अभिनेत्री आरती जैन(नाशिक) यांना देण्यात आले. 


कार्यक्रमाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.


तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी प्रायोजक म्हणुन श्रीरामपूर येथील कृष्णा कलेक्शन ,बेलापुर येथील नामांकित CGM ज्वेलर्स, मांजरी (राहुरी)सायली कलेक्शन व भार्गवी हॅन्ड मेद ज्वेलरी व बेलापूरचे भुषण माधुरीताई नवले यांनी मदतीचा हाथ देत देऊन बक्षिसंचा वर्षाव केला.


सदर कार्यक्रमात उखाणा स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,लकी ड्रॉ  खेळ या पध्दतीने स्पर्धा आयोजन केलेले असताना जवळपास 20 बक्षिसे वाटप करण्यात आली.


उखाणा स्पर्धा विजेत्या भगिनीमध्ये प्रथम क्रमांक सौ सम्पदा काळे,द्वितीय सौ.वनीता कर्पे, तृतीय सौ. सारिका बुरगुल व उत्तेजनार्थ पारितोषिक सौ.दीपाली पुराणिक यांना देण्यात आले.

महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ सुरेखा बावचे ,द्वितीय क्रमांक सौ.वैशाली भिंगरदे,तृतीय क्रमांक सौ शीतल साळुंके व सौ.कीर्ती जाधव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले .खेळामध्ये सौ शीतल साळुंके आणि सुरेखा बावचे यांनी बाजी मारत बक्षिसे पटकावली.


लकी ड्रॉ मध्ये नशीब आजमावताना सौ कांचन नवले,सौ नंदा पवार,सौ स्मिता शिंदे,मनीषा बोर्डे, सौ संगीता मंडलिक व सौ शोभा जाधव ई महिलांना लकी ड्रॉ चे बक्षिसे देण्यात आली.

 सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ दिपाली पुराणिक यांनी केले व संस्थापक प्रशांत शेळके यांनी  संपूर्ण स्पर्धांचे व खेळाचे आयोजन सांभाळत स्पर्धा पार पाडली .


सदर कार्यक्रमाच्या व जागृती फाउंडेशनची प्रस्तावना मांडताना संस्थपिका सौ ललिता नवघिरे यांनी  संस्थेचा उद्देश व प्रत्येक गरजु व्यक्तीच्या मदतीला धावुन जाण्यात आम्हाला आनंद वाटतो व असे सांस्कृतिक उपक्रम घेतांना महिला भगिनीना फक्त चुल व मुल यापलीकडेही जीवन आहेत याच उद्देशाने महिलांच्या चेहऱ्यावर एक संजीवनी देण्याचे काम अशा उपक्रमातून आम्ही करतो असे सांगितले.



सदर कार्यक्रमास जवळपास 130 पेक्षा जास्त महिला उपस्थित असताना CGM ज्वेलर्स च्या संचालिका सौ रेणुका मुंडलिक,सौ माधुरी नवले ,कु भार्गवी पुराणिक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.


अहमदनगर शाखा अध्यक्षा सौ ज्योतीताई जगताप यांनी कार्यक्रमाची सांगता करतांना सांगितले की माझा मैत्रिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमच्या कार्याची पावती असल्याचे बोलत सर्वांचे आभार मानून कार्यक्रम समाप्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत