राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पट्ट्यातील अवैद्य व बेकायदा वाळू वाहतूक उत्खरणास आळा बसवावा व योग्य ते वाळू धरण जाहीर ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पट्ट्यातील अवैद्य व बेकायदा वाळू वाहतूक उत्खरणास आळा बसवावा व योग्य ते वाळू धरण जाहीर करावे व चालू धोरणात सुसूत्रता येणे कामी महसुली विभाग पोलीस प्रशासन परिवहन विभाग आणि पर्यावरण यांची समिती तयार करावी या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील गुहा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ओहळ यांनी राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व तहसीलदार नारायण पाटील यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पट्ट्यातील बेकायदा वाळू उपसा यामागील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण हाती घेतले आहे. नव्या धोरणाची योग्य अंमलबजावणी झाल्यास सर्वसामन्यांना अंदाजे सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू मिळत आहे. यामुळे मक्तेदारांची दादागिरी थांबेल व बेसुमार अवैध उपसा थांबल्यास पर्यावरणाचाही हास थांबण्यास मदत होईल असे वाटले होते परंतु याच शासनाच्या विचारला तिलांजली प्रवरा पट्ट्यात आणि तालुक्यात भेटली आहे कारण, सध्याच्या वाळू साठ्याची मोठ्याप्रमाणावर चोरी होत असल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पट्ट्यातील वाळू चोरी, दाहतुक, बेकायदा वाळू उत्खननास आळा बसविण्यासाठी लवकरच आपण योग्य आणि नवीन सर्वंकष वाळू धोरण जाहीर करावे किवा चालू धोरणात सुसुसत्रता येणे कामी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन विभाग, आणि पर्यावरण वादी यांची समिती तयार करावी. यामुळे सध्याची मक्तेदारांची दादागिरी थांबेल व बेसुमार अवैध उपसा थांबून वाळू चोरीस पायबंध करण्यात येतील. वाळू वाहून नेणाऱ्या मोठ्या वाहनांना पूर्ण बंद घातली पाहिजे. मूठभर लोकांच्या फायद्यासाठी सामान्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घेतली वाळूचे दर, वाहतूक आणि अवैध वाहतूक याबाबतच्या सर्व अडचणी, उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण राहण्यासाठी सर्व समावशेक धोरण आपण तयार करावे.
सध्या वाळू वाहतुकीमुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या जीविताला धोका खूप वाढला आहे. वाळू वाहतूक करणारे विना क्रमांक वाहने राजरोसपणे सुसाट वेगाने चालताल त्यामुळे सामान्य नागरिक, विध्याथी यांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. याच बरोबर वाळू वाहतूक आणि उपसा यामुळे तालुक्यातील टोळी युद्ध कायम डोके वर काढत आहे.
यामुळे कायद्याचा धाक तालुक्यातून संपत आहे आणि गुन्हेगारी वाढत आहे. या व्यावसायत तरुण मुले येण्याचे प्रमाण वाढत आहे आणि एक पूर्ण पिढी खराब व्यसनाधीन होण्याचे मार्गावर जात आहे. तरी आपण याची दाखल घेऊन आपल्या धेयवान आणि नैतिकते नुसार योग्य तो निर्णय घेऊन कायद्याचे आणि संविधानाच्या मूल्यावर गदा आणणारे मूठभर लोकांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अनिल ओहोळ,अमोल बर्डे, बबन भांड, अक्षय शिंदे, बाळासाहेब वाल्हेकर,सागर उल्हारे आदींच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत