देवळाली प्रवरा(वेबटीम) महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा येथील काँग्रेस कमिटीच...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा येथील काँग्रेस कमिटीच्यावतीने देवळाली प्रवरा परिसरातील विविध शाळेमध्ये खाऊ वाटप करण्यात आले.
देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इनाम वस्ती शाळा, कदम व लाख वस्ती रोड शाळा येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते बाळासाहेब खांदे होते. तर या वेळी अजय खिलारी, कृष्णा मुसमाडे, वैभव गिरमे, नानासाहेब कदम, दीपक पठारे, भाऊसाहेब गुंजाळ, कारभारी होले, अशोक दत्तात्रय मुसमाडे, मेजर धनंजय येवले, अमोल वाळुंज, दत्तात्रय गडाख, चंद्रभान कदम आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रप्रमुख गायकवाड मॅडम, जाधव मॅडम, शिंदे मॅडम, साळुंके मॅडम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कोळसे सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत