राहुरी पोलिसांकडून व्यापाऱ्यांना 'एक कॅमेरा पोलिसांसाठी'चे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलिसांकडून व्यापाऱ्यांना 'एक कॅमेरा पोलिसांसाठी'चे आवाहन

राहुरी(वेबटीम)    राहुरी पोलीस ठाण्यात  शहरातील व्यापारी असोशियन यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध  व्यापारी यांच्या समस्या/ अडचणी जाणून ...

राहुरी(वेबटीम)



   राहुरी पोलीस ठाण्यात  शहरातील व्यापारी असोशियन यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध  व्यापारी यांच्या समस्या/ अडचणी जाणून घेण्यात आल्या.तसेच  त्यांच्याकडे असणारे उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरे रोडच्या अँगल मध्ये लावण्याबाबत सूचना केल्या व लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना केले आहेत. सदर कॅमेरे हे पोलीस विभागाच्या निर्देशाप्रमाणे लावण्यात येत असल्याने कुणीही व्यापाऱ्यांना परस्पर मागणार नाही याबाबत लेखी पत्र देण्यात आलेले आहे.




     राहुरी शहरातील पार्किंगची समस्या दूर करण्याकरिता राहुरी नगर परिषदेमार्फत पार्किंग रेषा आखून  कारवाई करणे बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच वाहतुकीस अडथळा करणारे अतिक्रमण नगरपरिषदेमार्फत तात्काळ काढून घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमादरम्यान राहुरी नगर परिषदेकडील स्वच्छता दूत यांचा त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता करण्याकरिता केलेल्या सहकार्याकरिता तसेच राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये  करत असलेल्या स्वच्छतेच्या कार्याकरिता सन्मान करण्यात आला. ज्यांनी पोलीस स्टेशन व परिसराची साफसफाई कामासाठी मदत केली असे श्री पवार (सेंनीटर इन्स्पेक्टर,राहुरी नगरपरिषद),क्रेन उपलब्ध करून देणारे  यमनाजी आघाव, वकील दांपत्य दुहेरी हत्याकांडाचा तपास ज्याच्या सतर्कतेमुळे  तात्काळ होवू शकला असे पो. कॉ.नदीम शेख पो.कॉ.प्रमोद ढाकणे यांचा ही सन्मान करण्यात आला.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नामदेव पाटील होते. यावेळी बाजार समिती सभापती अरुण तनपुरे , मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे,  व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, सूर्यकांत भुजाडी, देवेंद्र लांबे, विशाल तारडे, कांताशेठ तनपुरे,  वैभव धुमाळ, प्रवीण दरक,रवींद्र उदावंत, आत्तार कादरी, प्रसाद कोरडे ,एकनाथ खेडेकर, नंदू भट्टड  मोहन जोरी, सचिन वने, सलीम शेख, अनिल कासार  प्रवीण ठोकळे ,दीपक मुक्ता आदिंसह व्यापारी उपस्थित होते.



        पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी व्यापारी, हातगाडी, दुकानदार, ठेलेवाले, पथारी वाले यांना आवाहन केले की, रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने आपली दुकाने लावू नयेत, मोटरसायकल वाहने पार्किंग करू नये, कोणतीही रस्त्यावर अतिक्रमण करू नये,  अन्यथा अतिक्रमणाबाबत नगरपरिषदेमार्फत व वाहतुकीस अडथळा केल्यास पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत