श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार बंटी जहागिरदार तडीपार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार बंटी जहागिरदार तडीपार

श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपुर येथील सराईत गुन्हेगार अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार यास दोन वर्षाकरीता हददपार करण्यात आले असून डीवायएसप...

श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपुर येथील सराईत गुन्हेगार अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार यास दोन वर्षाकरीता हददपार करण्यात आले असून डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांनी कार्यवाही केली आहे.,


सराईत गुन्हेगार अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार वय ४९ वर्ष रा मदीना रोड वार्ड नं ०२ तालुका श्रीरामपुर जि. अहमदनगर याचे विरुद्व श्रीरामपुर शहर, श्रीरामपुर तालुका, नेवासा, मनमाड, भिवंडी, पुणे पो स्टे येथे मालाविरुद्धचे तसेच शरीराविरुद्धच गुन्हे त्यात खुन, कट करणे, ऑफिस सिक्रेट, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल , बॉम्बस्फोट, मारामारी आदी गंभीर गुन्हे आहेत.


या दाखल गुन्हयाच्या आधारे श्रीरामपुर शहरचे तत्कालीन अधिकारी हर्षवर्धन गवळी यांनी हददपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर यांच्या कार्यालयात सादर केला होता.


उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर यांच्याकडुन प्राथमिक चौकशी करीता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या कार्यालयात चौकशी करीता पाठविले होते. त्यावर श्री डॉ. बसवराज शिवपूजे यांनी चौकशी करुन सविस्तर अहवाल तयार करून उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर यांना सादर करण्यात आला  डॉ. बसवराज शिवपूजे यांनी पाठविलेला अहवाल ग्राहय धरुन मा.श्री किरण अरुण सावंत पाटील उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपुर यांनी यास अहमदनगर जिल्हा , पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, बिड जिल्हयातुन ०२ वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे.


तरी सदर हददपार इसम अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार वय ४९ वर्ष रा मदीना रोड वार्ड नं ०२7 तालुका श्रीरामपुर जि. अहमदनगर हे अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, बिड हददीत दिसुन आल्यास जवळ असलेल्या पोलिस ठाण्यात संपर्क साधुन तात्काळ कळवावे असे आवाहन डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत