राहुरी/वेबटीम:- तालुक्यातील गणेगाव येथील शैक्षणिक संकुलाचे सचिव व संस्थापक दत्तात्रय वाणी यांना हेसेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ने त्यांच्या ...
राहुरी/वेबटीम:-
तालुक्यातील गणेगाव येथील शैक्षणिक संकुलाचे सचिव व संस्थापक दत्तात्रय वाणी यांना हेसेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ने त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी पी एच डी जाहीर केली असुन शनिवारी पदवीदान समारंभ पुणे येथे होत असल्याचे पत्र विद्यापीठाने दिले आहे.
हेसेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जर्मनी मार्फत नुकतेच श्री वाणी यांना आपल्या ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यासाठी विद्यावाचस्पती पदवी जाहीर करत असल्याचे पत्र अदा करण्यात आले. विद्यापीठाचे प्रबंधक स्वेटलाना कोडॅक यांनी निवड व पदवीदान समारंभासाठी आमंत्रण पत्र प्रदान केले आहे.
दत्तात्रय वाणी हे गणेगाव ता राहुरी येथील प्रसादग्रामीण शिक्षण संस्था चे संस्थापक सचिव आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गणेगाव येथे २००८ सालीश्री बाळासाहेबवाणी सेंट्रेल स्कुल या तालुक्यातील पहिली सेंट्रल सी बी एस सी स्कूलची सुरुवात केली तसेच २०१९ ला मिसेस सरस्वती वाणी कॉलेजऑफ फार्मसी व २०२४ या वर्षी वाणीकॉलेजऑफ फार्मसी हे कॉलेजशैक्षणिक संकुलात सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना पी एच डी पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार दि २० एप्रिल रोजी पुणे येथील “रॅडीसन ब्ल्यू “येथे विद्यापीठाचे कुलगुरु फेराह मेलेक्सग्लू व बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेल यांच्या हस्ते पदवीप्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत