पानेगांव (वेबटीम) नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा राज्य सरकारच्य...
पानेगांव (वेबटीम)
नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून दूधाला सध्या २०रु भाव पाण्याची बाटली २५रु विकत आहे.वाढलेले खाद्याचे, चाऱ्याचे, पशुसंवर्धन साठी येणारा खर्च याचा कुठलाच मेळ बसत नसून दूध धंदा तोट्यात जात आहे.
शासनाच्या वतीने दूध अनुदान देण्याचं जाहीर केले होते त्याचा छदामही दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सध्या दूधाला हमी भाव ४०रु मिळावा तसेच मागील अनुदान देण्यात यावे. अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांची असून आपल्याच जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील हे दुग्ध विकासमंत्री असून त्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. एकिकडे शासन सांगत युवकांनी शेती धंद्याला दूध धंदा, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करावा आणि अशा प्रकारे धंदा तोट्यात जात आहे. आज शेतकऱ्यांचा कुठल्याच मालाला भाव नाही.खतांचा औषधे वाढलेल्या भरमसाठ किंमती या शेतकऱ्यांन मध्ये मोठा जन आक्रोश राज्य सरकार विषयी असल्याचं शेतकरी सांगत आहे. निवेदनावर दूध उत्पादक शेतकरी राजेंद्र चिंधे,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जंगले, उपाध्यक्ष जालिंदर जंंगले, बाबासाहेब जिवरक, ज्ञानेश्वर जंगले, ज्ञानेश्वर कल्हापूरे, राजेंद्र जंगले, बापूराव जंगले, रामदास चिंधे आदींच्या सह्या आहेत.
जवळपास ३६ रुपये पर्यंत गेलेला दूधाचा भाव राज्य सरकारने टप्या टप्याने २२रु आणला . ५रु अनुदान देण्याचं जाहीर केले होते ते आतापर्यंत मिळालेले नाही. वाढता खर्च लक्षात घेवून ४०रु भाव देवून अनुदान देण्यात यावे - राजेंद्र जंगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत