गुहा येथील वाबळे वस्तीवरील साईबाबा मंदिरात उद्या गुरुवारपासून साई चरित्र पारायण सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा येथील वाबळे वस्तीवरील साईबाबा मंदिरात उद्या गुरुवारपासून साई चरित्र पारायण सोहळा

गुहा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथे तांभेरे रस्त्यावरील वाबळे वस्तीवरील श्री साईबाबा मंदिरात गुरूवार दि. १८ ते बुधवार २४ एप्रिल २०२४ द...

गुहा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गुहा येथे तांभेरे रस्त्यावरील वाबळे वस्तीवरील श्री साईबाबा मंदिरात गुरूवार दि. १८ ते बुधवार २४ एप्रिल २०२४ दरम्यान साई सच्चरित् पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती सिद्धार्थ वाबळे यांनी दिली.


वाबळे वस्तीवरील भव्य-दिव्य साई मंदिरात दरवर्षी साई पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदाही १८ एप्रिल पासून  दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यत ग्रंथ वाचन व इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पारायणास बसणार्‍या सर्व वाचकांना आयोजकांकडून ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेस  महंत उध्दव महाराज मंडलिक, नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी, या सोहळ्याचा पंचक्रोशीतील साई भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  डॉ. विजय वाबळे, प्रा. विशाल वाबळे, प्रशांत वाबळे, सिद्धार्थ वाबळे, सुजित वाबळे,प्रशांत कोल्हे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत