राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५० हजार रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची बोलेरो प...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५० हजार रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप चोरून नेल्याची घटना आज शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली बंगला येथील विठ्ठल ज्ञानदेव कदम यांनी स्व मालकीची एम एच-२५ पी-४७१३ या क्रमांकाची बोलेरो पिकअप चारचाकी वाहन वैष्णवी चौक येथील सचिन मोरे यांच्या घराजवळ लावून गेले होते. आज सकाळी ६.३० सचिन मोरे घराबाहेर आले असता त्यांना पिकअप गाडी दिसून आली नाही. याबाबत त्यांनी गाडी मालक कदम यांना तात्काळ सांगितले. दरम्यान विठ्ठल कदम, विक्रम फाटे, चंद्रकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात सर्वत्र शोध घेऊन पाहणी केली मात्र पिकअप वाहन दिसले नाही.
याबाबत विठ्ठल कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत