राहुरी फॅक्टरी(वेबटीम) जगाला अहिंसा व प्रेमाचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याण दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथे भव्य दिव्य मिरवणूक काढ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
जगाला अहिंसा व प्रेमाचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याण दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
राहुरी फॅक्टरी येथील सकल जैन समाज बांधवांच्यावतीने पारंपारिक वाद्ययाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत जैन बांधवानी टिपरी नृत्याविष्कार सादर करून आनंद लुटला
राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी, बस स्टॅन्ड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अतिशय शिस्तबद्ध रित्या निघालेल्या जैन समाज बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या.कराळेवाडी येथील जैन स्थानकात विधिवत पूजन अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय महावीर युवक संघ व सकल जैन समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जैन बांधवांना भगवान महाविर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत