प्रा.दत्तात्रय वाणी यांना पीएचडी प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रा.दत्तात्रय वाणी यांना पीएचडी प्रदान

राहुरी( प्रतिनिधी) तालुक्यातील गणेगाव येथील  प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव व वाणी शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा प्रा. दत्तात्रय वाणी या...

राहुरी( प्रतिनिधी)



तालुक्यातील गणेगाव येथील  प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव व वाणी शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा प्रा. दत्तात्रय वाणी यांना हेसेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने पीएचडी प्रदान केली आहे.



     हेसेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जर्मनी मार्फत प्रा.वाणी यांना आपल्या ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यासाठी विद्यावाचस्पती पदवी पुणे येथील “रॅडीसन ब्ल्यू “ येथे विद्यापीठाचे कुलगुरु फेराह मेलेक्सग्लू  व बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

    दत्तात्रय वाणी  हे गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थाचे संस्थापक सचिव आहेत. या संस्थेच्या माध्यमातून  गणेगाव येथे २००८  साली बाळासाहेब वाणी सेंट्रेल स्कुल या तालुक्यातील पहिली सेंट्रल सीबीएससी स्कूलची सुरुवात केली तसेच २०१९ ला मिसेस सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी  व २०२४ ला वाणी कॉलेज ऑफ फार्मसी हे कॉलेज शैक्षणिक संकुलात सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी  त्यांना पी एच डी पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत