मानोरीत उद्या रविवारी मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मानोरीत उद्या रविवारी मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर

  राहुरी(वेबटीम)   राहुरी तालुक्यातील मानोरी येथे डॉ.वामन फाउंडेशनचे ओंकार हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर यांच्यावतीने टाकळीमिया येथील मातोश्री हॉस...

 राहुरी(वेबटीम)



  राहुरी तालुक्यातील मानोरी येथे डॉ.वामन फाउंडेशनचे ओंकार हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर यांच्यावतीने टाकळीमिया येथील मातोश्री हॉस्पिटल येथे रविवार दि.२६ मे रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 


या शिबिरात मूळव्याध, फिश्चुला, फिशर, कोंब येणे, भगंदर  तसेच हर्निया अपेंडीक्स  त्याचप्रमाणे गरगर्भ पिशवी शस्त्रक्रिया तसेच शरीरावरील गाठी काढण्याचे ऑपरेशन सवलतीच्या दरात केली जाणार आहेत. स्त्रियांच्या सर्व आजारांवर त्याचप्रमाणे हाडांचे सर्व आजार जसे की, कंबरदुःखी, गुडघे दुःखी, सांधेदुखी तपासणी मोफत केली जाणार आहे.हाडांच्या सर्व प्रकराच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याची संधी तसेच मानदुखी, कंबर दुःखी, खांदेदुःखी यावर माफक दरात फिजिओथेरपी  केली जाणार आहे. मानोरी गावात असलेल्या डॉ.अजिंक्य आढाव यांचे सिंधू हॉस्पिटल येथे सदर शिबीर संपन्न होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत