नगर (प्रतिनिधी) मराठा समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ राबवित असलेली "आजचा नि...
नगर (प्रतिनिधी)
मराठा समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ राबवित असलेली "आजचा निश्चय पुढचं पाऊल"ही पुस्तिका मराठा समाजाला दिशादर्शक ठरणार असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तसेच मराठा समाजाच्या विविध घटकांना मार्गदर्शन ठरणार्या "आजचा निश्चय पुढचं पाऊल"या पुस्तिकेचे प्रकाशन राज्यातील विविध जिल्ह्यांत होत आहे नगर जिल्ह्यातही आदर्श गाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या वेळी पवार यांनी या पुस्तिकाचा आढावा घेतला या वर प्रतिक्रिया देताना पोपटराव पवार म्हणाले बहुजन समाजामध्ये मराठा समाजाची भुमिका मोठ्या भावांची राहीली आहे या समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन करण्याची गरज होती ती आज या पुस्तकांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे दिसत आहे या पुस्तकांचा मोठा फायदा मराठा समाजाला होणार आहे समाजातील तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ च्या माध्यमातून कर्ज वाटप व सारथी सारख्या योजनांतून समाजातील मुला मुलींसाठी शिक्षणासाठी प्रोत्साहन यात मराठा महासघाचा असणारा सहभाग हा समाजाच्या उन्नतीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले
स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी चे योगदान न विसरता येणारे आहे समाजातील विविध घटकांनी या पुस्तकाचे वाचन करुन अनुकरण करण्याची गरज असून मराठा समाजातील तरुणांना मार्गदर्शन करणारी अखिल भारतीय मराठा महासंघ ही एकमेव संघटना असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले सारथी सारख्या मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रात पुढें नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेची पाहिली बैठक हिवरेबाजार येथे झाल्याची आठवण पवार या वेळी करुन दिली
यावेळी "आजचा निश्चय पुढचं पाऊल"या पुस्तकात बाबद जिल्हा सरचिटणीस रमेश बोरुडे यांनी सविस्तर माहिती दिली जिल्हा अध्यक्ष शिवाजी डौले, राहुरी तालुका अध्यक्ष दिनकर पवार, जिल्हा सल्लागार अॅड सयाराम बानकर, राहुरी शहराध्यक्ष प्रदीप भुजाडी, तालुका कार्याध्यक्ष विलास वराळे,सोशल मीडिया जिल्हा प्रमुख रविंद्र येवले, प्रेस फोटोग्राफर चंद्रकांत टिके, जामखेड तालुका अध्यक्ष प्रविण पवार तसेच हिवरेबाजार येथील ग्रामस्थ उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत