राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा या शाळेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राजश्री दत...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा या शाळेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राजश्री दत्तात्रय नालकर हिने 83.2% मिळून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रतीक रमेश मगर याने एकूण 80.2% मिळून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर श्रीतेज संजय आडभाई याने 77 टक्के मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी खा. प्रसाद तनपुरे,माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे,माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे,राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्याकडून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत