देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी सोहळ्याचे उद्या ४ जुलै रोजी सकाळ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी सोहळ्याचे उद्या ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
दरवर्षी देवळाली प्रवराई येथून श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात प्रस्थान केली जाते.यंदाचे दिंडी सोहळ्याचे १३ वे वर्ष असून सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत दिंडीला निरोप दिला जाणार आहे.
कोंढवड, वांबोरी, बुऱ्हानगर, शिरढोन,बनपिंप्री, मिरजगाव,निमगाव डाकु, करमाळा, टेंभुर्णी, परिते, गुरसाळे मार्गे ही दिंडी पंढरीत पोहोचणार आहे. भाविकांना दात्यांकडून अन्नप्रसाद, नाश्ता, चहापान व पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
या दिंडी सोहळ्याचे दत्ता पाटिल कडू, अजिंक्य कडू, भाऊसाहेब गडाख, देवराम कडू, शिवराम कडू, विठ्ठल कडू, एकनाथ पठारे, शिवाजी बोंबले, राजेंद्र पंडित, दिलीप मुसमाडे आदिंसह गावकरी नियोजन करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत