राहुरी/वेबटीम:- जागेच्या आर्थिक व्यवहारातून वाद होऊन चौघा जणांनी एका महिलेस व तिच्या सासऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील र...
राहुरी/वेबटीम:-
जागेच्या आर्थिक व्यवहारातून वाद होऊन चौघा जणांनी एका महिलेस व तिच्या सासऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे घडली असून याबाबत चौघा जणांना विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी खुर्द येथील फिर्यादी यांनी आरोपी यांना तीन गुंठे जागा २५ लाख रुपयांचा व्यवहार होऊन त्यास विकली होती. त्यातील चार लाख रुपये आरोपी यांनी फिर्यादीस दिलेले होते परंतु इतर २१ लाख अद्याप पर्यंत मागे दिलेले नव्हते त्या बदल्यात आरोपी यांनी घर भाडे भाडोत्री तत्त्वावर राहावयास दिले होते व त्याचे भाडे आरोपी हे भरणार होते.
आरोपी यांनी फिर्यादी यांच्या दुकानावर येऊन फिर्यादी राधिका पृथ्वीराजसिंग गिरासे व त्यांचे सासरे दगडूसिंग यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे तर तुम्ही बाहेरून आलात तुम्हाला येथे राहू देणार नाहीत अशी धमकी देखील आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या सासऱ्यास दिली.
फिर्यादी राधिका गिरासे यांच्या फिर्यादीवरून आरोपी उत्तम आप्पासाहेब गाडे,सुवर्णा उत्तम गाडे, तुषार उत्तम गाडे, शितल तुषार गाडे यांच्या विरोधात भादवि कलम 115(2),352,351(2),(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आव्हाड हे करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत