गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाणचे गो सेवेचे कार्य प्रेरणादायी- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाणचे गो सेवेचे कार्य प्रेरणादायी- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव(वेबटीम)  भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव संचलित गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाम यांचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी अठराव्या वर्षात प...

कोपरगाव(वेबटीम)



 भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव संचलित गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोकमठाम यांचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी अठराव्या वर्षात पदार्पण करत  १८ व्वा  वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. सतत सतरा वर्ष अविरत गो सेवेचे व्रत हातात घेऊन गोरक्षा केंद्राची हे सर्वजण कुठल्याही प्रकारच्या नावाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करत असून याला अठरा वर्षे पूर्ण झाले. 



या दिवसाचे औचित्य साधून आगळावेगळा व्हेजिटेबल केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले व आजच्या या दिवशी सर्व गोवंशाला वैरण चारा व फळे खाऊ घालून आजची गोसेवा पार पडली ,  यावेळेस गो शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 

         यावेळी अविरत १७ वर्षापासून गो सेवा करणारे कोपरगावातील मंगेश पाटील , शिखरचंद जैन , मनोज अग्रवाल,  राजेश ठोळे , संजय भन्साळी , संजय बंब , संदीप लोढा, प्रसाद नाईक  ,गोपीशेठ लोंगणी , सत्यन मुंदडा , हिरेन पापडेचा, ओंकार भट्टड , प्रणित कातकडे , जय बोरा , सद्गुरु जोशी  , राजेंद्र देवरे , शिर्डी येथील दर्शन वैद्य ,  आदी व्यापारी वर्ग तसेच गोसेवक उपस्थित होते.

           १७ वर्षांपूर्वी अवघ्या सात गोवंशावर चालू झालेले हे गोसेवा केंद्र आज हजारो गोवंशाचे जीव वाचवत आहे आणि त्याचे योग्य संगोपन करत आहे.

         यावेळी कोपरगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब व सौ देशमुख मॅडम यांनी सुद्धा गो सेवा केंद्राला भेट देऊन शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत