राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- उमेद सोशल फाउंडेशनच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथील योगाभवन येथे वृक्षारोपणासाठी वेगवेगळ्या रोपट्याचे वितरण करण्यात आ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
उमेद सोशल फाउंडेशनच्यावतीने राहुरी फॅक्टरी येथील योगाभवन येथे वृक्षारोपणासाठी वेगवेगळ्या रोपट्याचे वितरण करण्यात आले.
उमेद सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास सरस्वती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा पोटे उपस्थित होत्या. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एक रोपटे लावावे असे आवाहन मनीषा पोटे यांनी केले. श्री कुणाल तनपुरे यांनी फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली.
यावेळी ऍड. प्रदीप धनवटे,श्रीकांत राऊत, आर्ट ऑफ लिव्हिंच्या भक्ती अनारसे, राजलक्ष्मी पोटे आदी उपस्थित होते.
याकामी उमेद सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, सल्लागार अँड.दीपक धीवर, खजिनदार संजय निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत