राहुरी/वेबटीम:- आपल्या आवाजाने संपूर्ण राज्याला ज्याने भुरळ घातली असा.. आवाज महाराष्ट्रचा म्हणून अल्पावधीत राज्यात लोकप्रीय ठरलेला.. देवळा...
राहुरी/वेबटीम:-
आपल्या आवाजाने संपूर्ण राज्याला ज्याने भुरळ घातली असा.. आवाज महाराष्ट्रचा म्हणून अल्पावधीत राज्यात लोकप्रीय ठरलेला.. देवळाली प्रवराचा सुपुत्र.. वैभव ढूस लिखित “अंतः अस्ति प्रारंभः” हे पुस्तक प्रकाशना अगोदरच पुरस्काराचे मानकरी ठरले असुन लेखक वैभव ढूस यांना पुणे येथे महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
टायकून ऑफ एशिया, के के ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी, आणि ऍडीक्ट्रॉनिक मीडिया, व ट्रेडिंग कॅपिटल्स यांच्या वतीने सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते पुणे येथे वैभव ढूस यांना महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार 2024 पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
वैभव ढूस यांनी लिहीलेलं पहिलं पुस्तक “अंतः अस्ति प्रारंभः” या पुस्तकाला प्रकाशित होण्यापूर्वीच हजारोच्या संख्येने बुकिंग सुरु झाल्या आहेत., आणि.., याच प्रतिसादामुळे या पुस्तकाला प्रकाशित होण्या अगोदरच त्याचे लेखक वैभव ढूस यांना पुणे येथे आज सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल राजकिय, सामजिक, धार्मिक अश्या विविध स्तरातील मान्यवरांकडून वैभव ढूस यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जगणं राख झालं तरीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन खचलेल्या मनाला उभारी देत जो व्यक्ती अनुभवांच्या आणि सातत्याच्या जोरावर पुढे जातो तो खरा विजेता ठरतो…! पण.., विजेता होण्यापर्यंतचा प्रवास हा सोपा नसतो..! येणारे खाचखळगे.., संकटे.., आणि जिवनात अनंत अडचणींवर संघर्षाने मात करायला शिकवणारे माझे पुस्तक म्हणजेच अंत: अस्ति प्रारंभ: The End Is The beginning
महाराष्ट्राचे लाडके प्रेरणादायी वक्ते म्हणून ज्यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळविला.. असे., अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा गावचे सुपुत्र वैभव ढूस यांच्या लेखणीतून आणि शब्दांमधून साकारलेले अंत: अस्ति प्रारंभ: The End Is The beginning हे पुस्तक ज्यांना हवे आहे त्यांनी आपले नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड व मोबाईल नंबर सह बुकिंगसाठी 7499454645 या नंबर वर संपर्क करावा. पुस्तकाची किंमत फक्त २७०/- रूपये (Free Home Delivery) असून पुस्तकाचे बुकिंग झाल्यावर ४ ते ५ दिवसामध्ये आपल्या पत्त्यावर पुस्तक कुरिअरने मिळेल अशी माहिती आमचे प्रतिनिधीशी बोलताना वैभव ढूस यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत