श्रीरामपूर(वेबटीम) देशाच्या संरक्षण सेवेत कार्यरत असलेल्या ५ हजार सैनिकांना श्रीरामपूर येथील रहिवाशी व भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस प...
श्रीरामपूर(वेबटीम)
देशाच्या संरक्षण सेवेत कार्यरत असलेल्या ५ हजार सैनिकांना श्रीरामपूर येथील रहिवाशी व भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस पूजा चव्हाण यांनी राख्या पाठविल्या असून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या भावांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व इतर उपक्रम त्यांच्या मार्फत राबविले जाते. रक्षाबंधन सण सर्वत्र साजरा होत असताना देशाच्या सीमेवर असलेल्या भावांसाठी पूजा चव्हाण यांनी पोष्टाद्वारे राख्या पाठवून बहिण भावाच्या पवित्र नात्याला उजाळा दिला आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, भाजप जिल्हा सरचिटणीस व श्रीरामपूर विधानसभा संघटक नितीन दिनकर, महेंद्र पटारे, जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी कानडे, तालुकाध्यक्ष मंजुश्री ढोकचौळे,महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास ,मारुती बिंगले,विशाल अंभोरे, बंडूकुमार शिंदे,असिफ पोपटिया आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खा.सुजय विखे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, रणरागिणी महिला मंडळ अध्यक्षा धनश्री विखे यांनी स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत