राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गिरिकर्णिका फौंडेशन अहमदनगर यांच्या वतीने व राहुरी तालुका शिक्षक मित्र म...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये गिरिकर्णिका फौंडेशन अहमदनगर यांच्या वतीने व राहुरी तालुका शिक्षक मित्र मंडळाच्या विशेष सहकार्याने एक मूल एक फळझाड या उपक्रमांतर्गत ११११ फळझाड जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागाव नांदूर मराठी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागाव नांदूर उर्दू ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभेदार गाडे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमीन आखाडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडलिक आखाडा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी आदि शाळांमधील विद्यार्थ्यांना फळझाडांच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये आवळा, जांभूळ, सिताफळ, पेरू,चिंच आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गिरिकर्णिका फौंडेशनचे प्रदीप सोनवणे,जगदीश शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाचे ही महत्त्व विशद केले. याप्रसंगी गिरीकर्णिका फाउंडेशनचे किशोर पवार, प्रदीप सोनवणे,मयूर तनपुरे, सुरेंद्र राठोड, सोमनाथ डावखर,राजू नाणेकर,जगदीश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमातून पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धनाचा संस्कार वृद्धिंगत होण्यास अनमोल मदत होणार आहे.
गिरिकर्णिका फाउंडेशन कडून सदर फळझाडे उपलब्ध करण्यासाठी राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे,मच्छिंद्र लोखंडे, गणेश शिंदे, किरण इघे आदींनी प्रयत्न केले.
एक मूल एक फळझाड या अभिनव उपक्रमाबद्दल गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी गिरीकर्णिका फाउंडेशन व राहुरी शिक्षक मित्रमंडळाचे अभिनंदन केले.समाजातील प्रत्येक घटकाने याप्रमाणे आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपण चळवळ उभी केल्यास ग्लोबल वार्मिंगची समस्या दूर होण्यास हातभार लागेल असे मत व्यक्त केले.
तसेच गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा संस्कार शालेय वयात दृढ झाल्यास भविष्यात वृक्षप्रेमी नागरिक निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली व प्रत्येक शाळेत एक मूल एक फळझाड हा उपक्रम अग्रक्रमाने राबवावा असे प्रतिपादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत