राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत देवळाली प्रवरा येथील मुसमाडे वस्ती येथे सुभाष श्रीमल मुथा यांचे शेत गट नंबर 20 मधील विहिर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत देवळाली प्रवरा येथील मुसमाडे वस्ती येथे सुभाष श्रीमल मुथा यांचे शेत गट नंबर 20 मधील विहिरीत
04/08/2024 रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान एक अनोळखी इसमाचा मृत्यू देह विहिरीत तरंगताना आढळून आलेला होता. सदर मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी त्याच्या सोबत कुठलेही ओळखपत्र किंवा कागदपत्रे नव्हती. पाण्यात बॉडी सढल्यामुळे चेहराही समजून येत नव्हता. सदर अकस्मात मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास करताना पोलीस हवालदार हनुमंत आव्हाड यांनी सदर मयता चे फोटो समाज माध्यमावर पाठवून ओळख पटविण्याचे आव्हान केले असता आज दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सदर मयताचे वडील श्री भारत बाजीराव शिंदे वय 52 वर्ष, धंदा मजुरी राहणार गणेश नगर देवळाली प्रवरा.यांनी समक्ष येऊन मयत इसम हा त्यांचा मुलगा नामे सौरभ भारत शिंदे वय 25 वर्षे राहणार कारवाडी गणेश नगर देवळाली प्रवरा असल्याचे सांगून तो दिनांक 1/08/2024 रोजी घरातून बेपत्ता झालेला होता. परंतु तो मनोरुग्ण असल्याने व नेहमी नेहमी घरातून निघून जात असल्यामुळे त्याची हरवल्याबाबतची तक्रार दिलेली नव्हती. सदर मृत इसमाची ओळख पटल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी.भारत बाजीराव शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक फौजदार विष्णू आहेर, पोलिस हवलदार हनुमंत आव्हाड, पोलीस नाईक बागुल यांच्या पथकाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत