राहुरी/वेबटीम:- राज्य मराठी पञकार परीषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी रफीक शेख तर उपाध्यक्ष गोविंद फुणगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे...
राहुरी/वेबटीम:-
राज्य मराठी पञकार परीषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी रफीक शेख तर उपाध्यक्ष गोविंद फुणगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
आज सकाळी राहुरी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते तालुका अध्यक्ष विनित धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी सर्वानुमते निवडी करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाने रफीफ शेख (अध्यक्ष), गोविंद फुणगे (उपाध्यक्ष), संजय कुलकर्णी(कार्याध्यक्ष), प्रसाद मैड(सचिव),श्रीकांत जाधव (सहसचिव),बाळासाहेब कांबळे(संघटक), ऋषी राऊत(प्रसिद्धी प्रमुख) ,प्रभाकर मकासरे (खजिनदार) तर जिल्हा कार्यकारणीमधे विनित धसाळ, दत्तात्रय तरवडे, बाळासाहेब रासने,अनिल कोळसे आणि राहुरी तालुका कार्यकारणीमधे श्रीकांत जाधव, राजु आढाव,आकाश येवले,मनिष पटेकर,बंडू म्हसे आदिंच्या निवडी करण्यात आल्या आहे.
नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे उत्तर जिल्हा जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे,जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत