दैनिक सार्वमंथनच्यावतीने उद्या रविवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान सोहळा अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची उपस्थिती देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, आण्णासाहेब चोथे, पत्रकार गणेश अंबिलवादे यांच्यासह अनेकांचा गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दैनिक सार्वमंथनच्यावतीने उद्या रविवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान सोहळा अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची उपस्थिती देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, आण्णासाहेब चोथे, पत्रकार गणेश अंबिलवादे यांच्यासह अनेकांचा गौरव

  राहुरी(वेबटीम):- अहमदनगर जिल्ह्यात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे, राहुरी तालुक्यातून प्रसि...

 राहुरी(वेबटीम):-


अहमदनगर जिल्ह्यात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे, राहुरी तालुक्यातून प्रसिद्ध होणारे एकमेव सायं दैनिक. सार्वमंथन वृत्तपत्राचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त  सार्वमंथन पुरस्कार २०२४ सोहळा रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी  सकाळी ११.३० वा.राहुरी शहरालगत नगर-मनमाड मार्गावर असलेल्या विठ्ठला लॉन्स येथे संपन्न होणार असून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.


 श्री.क्षेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणारा असून या निमित्ताने प्रमुख आकर्षक म्हणून सोनी मराठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फिल्म अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहणार आहे. दरम्यान या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून खासदार निलेश लंके, माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ,माजी खासदार सुजय विखे ,जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, राहुरी बाजार समिती सभापती अरुण तनपुरे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे ,माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम ,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे ,राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे ,धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक राजुभाऊ शेटे,जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे ,निसारभाई शेख ,शौकत भाई शेख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 *सायं. दैनिक सार्वमंथन पुरस्काराचे मानकरी*

उद्योग-मिलिंद भोईटे(संस्थापक, उपसरपंच चहा), सामाजिक- प्रकाश मार्शलभाऊ संसारे( माजी उपनगराध्यक्ष देवळाली प्रवरा), आरोग्य-राजेंद्र लक्ष्मण पवार (आरोग्य अधिकारी, राहुरी नगरपरिषद ),प्रशासकीय सेवा- प्रताप पांडुरंग दराडे( वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,कोतवाली,अहमदनगर)

महसूल- एफ.आर.शेख (तहसीलदार,बार्शी ,सोलापूर) शैक्षणिक -सौ.भारती खिलारी(संत गाडगे महाराज शिक्षण संस्था), राजकीय- ताराबाई भिमराज वाघ( लोकनियुक्त महिला सरपंच मानोरी),सामाजिक -अब्बासभाई उस्मान शेख (माजी सरपंच,मानोरी) वैद्यकीय- डॉ. प्रकाश रावसाहेब पवार (बालरोग तज्ञ,राहुरी) , पत्रकारिता गणेश गोरक्षनाथ आंबिलवादे (पत्रकार, देवळाली प्रवरा), सहकार अण्णासाहेब दगडू चोथे( माजी चेअरमन,आदर्श नागरी पतसंस्था), शैक्षणिक- मच्छिंद्र शिवदास लोखंडे (नूतन मराठी शाळा, राहुरी नगरपरिषद), अध्यात्मिक- महंत अरुणाथगिरीजी महाराज, अडबंगनाथ देवस्थान, भामाठाण, प्रशासकीय- सोमनाथ वाकचौरे (डीवायएसपी, संगमनेर),औद्योगिक-सचिन वसंतराव ठुबे (शेतकरी उद्योजक), उद्योग-कांताभाऊ तनपुरे(संस्थापक, व्यंकटेश उद्योग समुह)


तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक सार्वमंथनचे मुख्य संपादक अनिल कोळसे, कार्यकारी संपादक संजय संसारे, उपसंपादक सागर दोंदे, जाहिरात व्यवस्थापक गणेश जोशी,कार्यालयीन प्रमुख सोमनाथ वाघ तसेच कर्मचारी व सार्वमंथनचे जिल्ह्यातील प्रतिनिधी, वार्ताहर,वृत्तपत्र वितरक यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत