देवळाली प्रवरा(वेबटीम) बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून लहान मुलांना अशा गोष्टींची मा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून लहान मुलांना अशा गोष्टींची माहिती तरी कशी द्यावी असा प्रश्न त्यांना पडला असताना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर येथील स्व.विठ्ठलराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलमधील विद्यार्थीनींसाठी गुड टच आणि बॅड टच विषयावर कार्यशाळा आज २३ रोजी पार पडली.
बदलापूर घटनेनंतर सरकारी, खासगी अशा सर्वच शाळांमध्ये लैंगिकतेसंबंधी जागृती करणारा ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम राबविणे गरजेचे बनले आहे.
विद्यार्थिनींना कोणती व्यक्ती कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे, हे त्यांना समजणे आवश्यक आहे. ते समजण्याची क्षमता प्राप्त झाली तर लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलमधील महिला शिक्षिकांनी ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम राबविला.
यावेळी संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पठारे, मुख्याध्यापिका पल्लवी पठारे,श्रद्धा निद्रे, अंजली बेहळे,सोनाली पुंडकर,सारिका बागुल, कविता पांडे, ज्योती चव्हाण, अनुराधा पवार, स्वाती जाधव, रोहिणी कोळसे, पूजा वंजारी, बी ए. विधाटे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत